रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi 2023

रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण. रक्षाबंधना बरोबरच दीपावलीमध्ये येणारी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशीही बहीण भावाला ओवाळते. खरंतर भावा बहिणीचं नातं एका नाजूक धाग्यांनी बांधलेलं असतं.

हे धागे नाजूक, स्नेहाचे, मायेचे असतात. बहिण हे आईचं दुसर रूप असते. ती आपल्या भावाची सर्व तरी सर्वतोपरी काळजी घेत असते आणि भाऊ देखील या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिला तिच्या संरक्षणाची तिच्या सुखदुःखात सामील होण्याची एक प्रकारे हवीच तो देत असतो. असा हा रक्षाबंधनाचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा . आज आपण रक्षाबंधन निबंध ह्या लेखात पाहूया..

रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi
रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi | मराठी सखा

रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay In Marathi

भारत हा विविध सणांची मांदियाळी असलेला देश आहे. त्यातही श्रावण महिना म्हटला की एका मागोमाग एक असे सण आपल्या भेटीला येतात. याच श्रावणातला एक महत्त्वाचा सण जो भावाबहिणींच्या पवित्र प्रेमाची साक्ष देतो तो सण म्हणजे रक्षाबंधनाचा!

आपल्याकडे विविध नात्यांचे असे सण आहेत. जसे की मातृदिन, पितृदिन, पती आणि पत्नीसाठी दीपावलीतील पाडवा तसेच बहीण भावांसाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज! संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांना बहीण नाही किंवा भाऊ नाही अशा व्यक्तीदेखील हा सण साजरा करतात. आपल्याकडे चंद्राला मामा म्हटले जाते.

ज्या बहिणीला भाऊ नाही ती चंद्रालाच आपला भाऊ समजून त्याला प्रतिकात्मक रूपानं राखी बांधत असते. भावा- बहिणीतील पवित्र, स्नेहार्द आणि अतुट अशा नात्यांचा हा एक पवित्र सण! यात बहीण आपल्या भावाच्या मनगटावर एक नाजूक धागा बांधते. त्याला ओवाळते. त्याच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करते. त्याला गोडधोड खाऊ घालते. त्या बदल्यात भाऊ तिला तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतली अशी शपथ देतो! भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

विशेषतः महाराष्ट्रात राखी पौर्णिमेला “नारळी पौर्णिमा” असेदेखील म्हणतात. खरंतर बहीण ही आपल्या आईचं दुसरे रूप असते. आई-वडिलांकडून भावाला मिळणारा मार ती अनेकदा वाचवते. त्याला आपल्या पदराखाली घेते. मला आठवतंय एका कवितेत कवीने बहिणीला हळदीच्या झाडाची उपमा दिली होती. कारण ती बहीण प्रत्येक वेळी आपल्या भावाचीच बाजू घ्यायची. भावाने काही खोड्या केल्या तरी ती आईपुढे त्याचीच बाजू घ्यायची. प्रत्येक वेळी भावाच्या चुकांवर हळदीचा लेप लावायची. म्हणजेच सरवासारव करायची म्हणून आई तिला हळदीचे झाड म्हणायची. खरंच अशाच असतात या बहिणी.

आपल्या भावाचं गुणगान करण्यात, कौतुक करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. जुन्या काळात बहिणी कमावत्या नव्हत्या. अबला होत्या. त्यावेळी भावांनी बहिणीचं रक्षण करणे हे क्रमप्राप्त होते. परंतु आजच्या काळात बहिणी शिकल्या. स्वतःच्या पायावर उभे राहिल्या. त्यामुळे आजच्या काळातील बहिणी स्वतःच भावाच्या रक्षणाची जबाबदारी घेताना दिसतात. त्यामुळे रक्षाबंधनाला एक वेगळाच नवा अर्थ प्राप्त झाला आहे. जुन्या काळात मुलीचे लग्न झाल्यानंतर ती संपूर्ण कुटुंबाला दुरावत असे. परंतु आज बहिणीचं वेगळं घर झाले तरी ती सर्वांच्या जवळच असते कारण आधुनिकीकरणामुळे नात्यांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त झाला आहे. तसेच मोबाइलमुळे ही जग जवळ आले आहे.

मोबाइलमुळे जग जवळ आले जग याचा अर्थ संवाद वाढला असे नव्हे. उलटपक्षी संवाद कमी झालाय असेच जाणवते. मित्रांनो असं म्हणतात की नात्यातल्या घर्षणाला संवादात रूपी वंगाणाची गरज असते. त्यामुळे बहीण असो, भाऊ असो, मित्र असो वा इतर नातेवाईक असोत या सर्वांशी कायम संपर्कात राहणं हे आजच्या काळाच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे.

आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण एवढं मनाशी ठरवूया की मी नियमितपणे फोनवरून का होईना पण सगळ्यांशी संवाद साधेल. असे घडले तरच खऱ्या अर्थाने आजचा हा नात्यांचा सण साजरा झाला असे मी समजेल.

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

रक्षाबंधन निबंध मराठी

भारत हा विविध सणांची मांदियाळी असलेला देश आहे. त्यातही श्रावण महिना म्हटला की एका मागोमाग एक असे सण आपल्या भेटीला येतात. याच श्रावणातला एक महत्त्वाचा सण जो भावाबहिणींच्या पवित्र प्रेमाची साक्ष देतो तो सण म्हणजे रक्षाबंधनाचा!

रक्षाबंधन चे चित्र

आपल्या बहिण भावांना मराठीमध्ये शुभेच्छा पाठवण्यासाठी शुभेच्छा फोटो आणि शुभेच्छा स्टेटस

Leave a comment

error: