झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva

उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो,

आज मी तुमच्याशी “झाडे लावा झाडे जगवा” या विषयावर बोलणार आहे.

झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva
झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva | मराठी सखा

झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva

मित्रहो जो आपल्याला नेहमी मदत करतो, कोणत्याही कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी उभा राहतो, मदत करताना कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, तोच आपला खरा मित्र असे मला वाटते. आणि म्हणूनच झाडे मला आपले मित्र वाटतात. बघा ना, फक्त झाड असा शब्द जरी उच्चारला तरीसुद्धा किती आनंद वाटतो! त्यांचा हिरवागार रंग पहावा, त्याच्या थंडगार सावलीत बसावं, त्यांनी दिलेली गोड गोड फळे खावीत त्याच्या अंगा खांद्यावर खेळावं खरंच झाड म्हणजे नुसता आनंद फक्त आनंद……..!

झाडे काही फक्त आपल्यालाच उपयोगी पडतात असं नाही. पक्षी त्यांचे घरटं झाडांवरच बांधतात, त्याचीच फळे खाऊ राहतात, गायीगुरे दुपारी सावलीत झाडाखालीच बसतात. जिथे खूप झाडे असतात तिथे पाऊसही जास्त पडतो. ते माती घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे सुपीक माती वाहून जात नाही. झाडांपासून आपल्याला औषधेदेखील मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडे आपण सोडलेला धूर म्हणजेच कार्बन डायऑक्साइड पितात आणि उपयोगी असा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन सोडून देतात. त्यामुळे आपल्याला झाडांच्या संगतीत प्रसन्न आणि आनंदी वाटतं!

झाडांची एक गोष्ट मला जास्त महत्त्वाची वाटते. ते म्हणजे ते कधीच भेदभाव करत नाही. जे लोक पाणी देतात, खत घालून वाढवतात त्यांना तर फळे देतेच परंतु जी लोकं त्याच्या फांद्या तोडतात त्याचा पाला तोडून नेतात अशा लोकांनासुद्धा ते त्याच प्रेमाने फळे देते. झाड कधीच श्रीमंत-गरीब, लहान-मोठा, मुलगा- मुलगी असा भेद करत नाही पण जेव्हा आपल्यासारखी माणसं असा भेदभाव करतात तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटतं.

खरंच झाडे आपल्याला समानता शिकवतात, त्याग, परोपकार, दयाळूपणा, मदत यासारख्या गुणांचं महत्त्व ते त्यांच्या वागणुकीतूनच आपल्याला सांंगतात.

झाडे आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात, म्हणून आपण वड, पिंपळ, उंबर यासारख्या झाडांची पूजा करतो. आंब्याची, केळीची आणि विड्याची पाने आपण धार्मिक कार्यात वापरतो. तुळशीचे झाड तर आपण घरातच लावतो. भगवान कृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे की मीच पिंपळ वृक्ष आहे!

खरेच झाडे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून आपण वृक्षांची लागवड केली पाहिजे व त्यांची वाढ, जोपासना केली पाहिजे. विनाकारण केवळ पैशासाठी झाडांची तोड करणे हे पाप आहे. आपण प्रगतीच्या नावाखाली खूप झाडे तोडतो. त्यामुळे घडलेेले वातावरणातील बदल आता आपल्या लक्षात आलेले आहेत. पाऊस कधीही पडतो. कधी खूप पडतो तर कधी पडतच नाही. कधी खूूप गरम होतं तर कधी थंडी खूप पडते. असे विचित्र अनुभव आपल्याला सध्या पाहायला मिळतात. हे सर्व बेसुमार वृक्षतोडीमुळे झाले आहे असे मला वाटते.

आपल्या भारतात जंगलांचे प्रमाण केवळ 24 टक्के तर महाराष्ट्रात 20 टक्के आहे. खरे तर जंगलाचे आदर्श प्रमाण एकूण जमिनीच्या 33 टक्के असावे असे मानले जाते. या जंगलतोडीमुळेच भारतात विविध स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागते असे माझे ठाम मत आहे.

म्हणून मी सांगते मित्रांनो झाडे ही आपली मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत. संत तुकारामांनीसुद्धा असंच सांगितलेलं आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”! खरेेच झाडांची तोड पक्ष्यांंच्या मुळावरच येते. केवळ त्यांच्याच नाही तर माणसांच्याही आणि सर्व प्राणी जगताच्याही! झाड तोडीमुळे सर्वांचेच अस्तित्व धोक्यात येते म्हणून माणसाने विचार केला पाहिजे आणि तसे वागले पाहिजे.

मी तर असं म्हणेन की , माणसांनो एक वेळ तुम्ही झाडं नाही लावली तरी चालतील! पण कृपया ती तोडू तरी नका.कारण निसर्ग झाडांच्या वाढीची स्वतःच काळजी घेईल. तुम्ही त्यात लुडबुड तेेवढी करू नका! जमेल ना एवढं तरी तुम्हाला !

हाच विचार पुढे घेऊन जाणारी एक कविता मी सादर करते आणि आपली रजा घेते

कवितेचं नाव आहे – झाड

बघ आई झाड कसं

वेड्यासारखं करतं

फुकट देतं सगळ्यांना

असं कोण वागतं

गोड गोड फळांचे ते

पैसे घेत नाही

घरटी बांधतात पक्षी पण

भाडे नाही काही

देते हवा शुद्ध आणि

सावली थंडगार

काळ्याकुट्ट मातीलाही

तेच असे आधार

प्राणी पक्षी मुलांसाठी

ठिकाण आनंदाचं

अंगावरती खेळा त्याच्या

विना पैशाचं!

पाऊसपाणी आपल्यासाठी

तेच काळजी घेतं

गुण त्याचे औषधी

पण मोल त्याचं नसतं

कोण तोडतं कोण जाळतं

जरी खूप छळतं

सार्‍यां सोबत त्याचं वागणं

नेहमी चांगलं असतं

सांग मला आई आपण

असं का गं वागतो

झाडासारखं जगणं सोडून

दूर सारे पळतो

तू म्हणतेस म्हणून मी

खूप झाडं लावीन

पण मोठेपणी कधीतरी

मीच झाड होईन !

मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

आपण झाडे का लावावीत?

कारण झाडांमुळेच पावसाचे प्रमाण ठरते.ते प्रदूषण कमी करतात. झाडे माती धरून ठेवतात त्यामुळे सुपीक जमिनीची धूप होत नाही. झाडे शीतल छाया देतात,फळे देतात,तर काही झाडे औषधे देखील असतात आणि म्हणून आपण झाडे लावावीत. पशुपक्ष्यांच्या वाढीसाठी झाडेच मदत करतात कारण त्यांना झाडांमुळे उत्तम अधिवास मिळतो.

नवीन झाडे मोठ्या प्रमाणात का लावायची?

कोणत्याही देशातील वन जमिनीचे प्रमाण हे एकूण क्षेत्रफळाच्या 33% असावे असे मानले जाते. भारतात अवघे 25% तर महाराष्ट्रात 20% वनक्षेत्र आहे. कमी वनक्षेत्रामुळे देशात व महाराष्ट्रात बऱ्याचदा अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो. बेसुमार वृक्षतोडीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. म्हणूनच आपण नवीन झाडे लावली पाहिजेत आणि ती वाढवली पाहिजेत.

2 thoughts on “झाडे लावा झाडे जगवा | Zade Lava Zade Jagva”

  1. This essay is very beautiful 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌. My teacher is appreciates me ……. For this essay ..

    Reply
    • धन्यवाद…आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. असेच मराठी सखाला भेट देत राहा आणि मराठी भाषेचा आनंद घेत राहा.

      Reply

Leave a comment

error: