वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din | १५ ऑक्टोबर

१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन….

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. अत्यंत गरिबी असतानादेखील डॉक्टर कलामांनी केवळ अभ्यास, जिद्द, मेहनत आणि अपरिमित कष्ट यांच्या जोरावर आपल्या आयुष्यात हे प्रचंड मोठे यश मिळवले !

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din | १५ ऑक्टोबर
वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din | १५ ऑक्टोबर | मराठी सखा

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prerna Din

राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे सर्वात लाडके शास्त्रज्ञ राष्ट्रपती होते. त्यांना मुले खूप आवडत असत. राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी भारतातील अनेक शाळा, कॉलेजमध्ये मुलांची भेट घेतली. लाखो मुलांशी गप्पा मारल्या. त्यांच्यात चैतन्य निर्माण केलं. प्रचंड आशावाद निर्माण केला. स्वतःच्या अनुभवावर त्यांनी काही पुस्तके लिहिली जी संपूर्ण भारतात अत्यंत लोकप्रिय झाली. आणि आजही आहेत.

शिक्षणाची वा श्रीमंतीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानादेखील एक सर्वसामान्य कुटुंबातला, अत्यंत गरिबीत वाढलेला मुलगा, जेव्हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार पटकावतो, भारतातील सर्वोच्च स्थानावर बसतो. तेव्हा सहाजिकच सर्वसामान्य सामान्य जनतेला ती व्यक्ती आदर्शवत वाटू लागते आणि असेच होते आपले डॉक्टर कलाम!

प्रत्येक भारतीयाच्या मनात, हृदयात विराजमान झालेले. त्यांचा शेवटदेखील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच झाला. त्यांच्या प्रगल्भ विचारांनी भारतातील लाखो विद्यार्थी प्रेरित झाले. त्यातून कितीतरी शास्त्रज्ञ व इतर क्षेत्रात उच्च दर्जावर काम करणारे विद्यार्थी तयार झाले असतील. मुलांमध्ये राष्ट्रभक्तीचे बीज पेरण्यात डॉक्टर कलामांचा कोणीच हात धरू शकत नाही. इतके मोठे काम डॉक्टर कलाम यांनी केलेले आहे. अशा या लोकप्रिय माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना माझा सलाम.

भारतातील असंख्य गरीब मुलांच्या मनात आशावादाची ज्योत पेटवणारे डॉक्टर कलाम. ज्यांनी केवळ शिक्षणाच्या जोरावर उच्चपद हस्तगत केले असे कलाम. आपल्या आयुष्यात फक्त पुस्तकांना जवळ करणारे डॉक्टर कलाम हे भारतातील एक आदर्शवत असे व्यक्तिमत्व होते. आयुष्यभर ज्ञानग्रहण करून त्यातूनच आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचला आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.

मित्रांनो म्हणूनच आपणही ग्रंथालयाची वाट धरायला हवी. आपल्या या आयुष्यामध्ये जो अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे तो ग्रंथालयाची वाट धरल्याने प्रकाशमान होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणूनच पुस्तकांना आपण जवळ केलं पाहिजे. कारण ग्रंथ हेच गुरू हे आपण लक्षात ठेवायला हवे.

खरेच पुस्तके आपल्याला काय देतात….

प्रिय पुस्तकांनो……
तुम्ही ज्ञान, माहिती देता….
बोलतं—लिहितं करता………
शब्द संपत्ती वाढवता………..
विचार करायला प्रवृत्त करता…
निर्णय घेण्याचं बळ देता………
संवेदनशील बनवता……………
जीवन समृद्ध करता…………..
जगायचं कसं हे शिकवता…….
मनाची एकाग्रता वाढवता…..
भाषा समृद्ध करता…
संयम वाढवता……………….
नित्य नवे बनवता…….
बुद्धीचा, अनुभवाचा आवाका वाढवता..
लेखन शैली,भाषेची रुपे समजावून सांगता..
कल्पनाशक्तीला चालना देता….
खूप खूप आनंद देता…..
आमचाच आम्हाला शोध लावून देता..
एक चांगला माणूस बनवता……….!

चला तर मग आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक खूणगाठ मनाशी पक्की बांधूया आणि ग्रंथालयाची वाट धरूया. दर आठवड्याला नाही किमान महिन्याला तरी एखादं चांगलं पुस्तक वाचूया आणि आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करूया.

धन्यवाद..

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

वाचन प्रेरणा दिन म्हणजे काय?

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. आयुष्यभर ज्ञानग्रहण करून त्यातूनच आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचला आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.

वाचन प्रेरणा दिन किती तारखेला साजरा केला जातो?

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.

Leave a comment

error: