26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day

सर्व उपस्थित शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो. आज २६ जानेवारी. आपण सारे जण शाळेमध्ये झेंडावंदन करण्यासाठी आलेलो आहोत.

26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day | marathi sakha
26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day | marathi sakha

26 जानेवारी भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण | 26 January Republic Day

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे वर्षातले दोन दिवस आपण शाळेमध्ये आपला तिरंगा झेंडा फडकवतो. त्यातला १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन तर २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि २६ जानेवारीला भारत प्रजासत्ताक बनला.

आता तुम्ही म्हणाल प्रजासत्ताक म्हणजे काय?तर, प्रजा म्हणजे जनता, लोक. लोकांची सत्ता, प्रजेची सत्ता. ज्या देशांमध्ये जनतेची सत्ता असते, लोकांची सत्ता असते, ज्या देशात लोकांनी मतदान करून आपले राज्यकर्ते निवडलेले असतात, तो देश प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीयांनी आपली राज्यघटना तयार केली आणि त्याद्वारे लोकांनी निवडून दिलेले राष्ट्रपती हे पद निर्माण केले गेले. २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेप्रमाणे देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने सुरू झाला. अशा प्रकारे भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले.

मित्रांनो आजचा दिवस आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. कारण आपल्या देशावर आपल्या लोकांचे, आपल्या बांधवांचे राज्य आहे आणि ते आपल्यासाठी काम करतात. तुम्हाला माहीत आहे, की आपल्या देशावर आठशे वर्ष मुस्लिम राज्यकर्त्यांनी आणि दोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले. आपल्या देशावर राज्य करताना त्यांनी जनतेचे अतोनात हाल केले. अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी बलिदान दिले तेव्हा हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे हे सर्व आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

जगात आजही अनेक देशांमध्ये लोकशाही नाही. ते देश प्रजासत्ताक नाहीत. तेथील जनतेला मतदानाचा अधिकार नाही. आपले राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्राचा एक बहुमूल्य ठेवा आपल्या स्वाधीन केला आहे. त्याला जतन करून ठेवण्याचे काम आपल्या पिढीचे आहे आणि म्हणूनच प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन आपण तो मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा केला पाहिजे. आणि आपल्या स्वातंत्र्यवीरांचे, त्यांच्या बलिदानाचे, त्यांच्या कार्याचे स्मरण कायम ठेवले पाहिजे.

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment

error: