नमस्कार माझ्या बालमित्रांनो…
आज आहे १५ ऑगस्ट! आणि माझ्या हातात आहे तिरंगा झेंडा! आपला तिरंगा आपल्या भारतदेशाचा तिरंगा. कारण आज आहे आपला स्वातंत्र्यदिन! अरेच्चा! काय नाही कळले. हे बघा माझ्या बालमित्रांनो, खूप वर्षांपूर्वी आपल्या देशावर इंग्रज लोकांचे राज्य होते. मग आपल्या लोकांनी मोठा लढा देऊन इंग्रज लोकांना घालवून लावले. आणि मग आपला देश स्वतंत्र झाला. तो दिवस होता. १५ ऑगस्ट. म्हणून आपण या दिवसाला स्वातंत्र्यदिन म्हणतो.
मला १५ ऑगस्ट हा दिवस खूप म्हणजे खूपच आवडतो. कारण या दिवशी शाळेला जरी सुट्टी असली तरी शाळेत जायचं असतं. दप्तर न घेता. नवे पांढरे शुभ्र कपडे घालून. छातीवर भारताचा तिरंगा लावून. एकदा का तिरंगा लावला की इतकं भारी वाटतं ना की काय सांगू! मला तर अगदी सैनिकच झाल्यासारखं वाटतं.
त्या दिवशी सगळी शाळा सजवतात. रांगोळ्या काढतात. फुलांच्या माळा लावतात, रेडियोवर देशाची गाणी लावतात. मला ना ते “जिंकू किंवा मरू” हे गाणं खूप आवडतं बरं. आपल्या तिरंगा झेंडा तीन रंगांचा आहे बरं. काही मुलं चुकीचं सांगतात की तिरंगा चार रंगाचा म्हणून. आता तुम्हीच सांगा मित्रांनो तो चार रंगाचा असता तर चौरंगा नसतं का म्हटलं त्याला!
तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण आठवूया त्या सर्व थोर आणि पराक्रमी वीरांना ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले.
आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. राष्ट्रगीताच्या वेळी नीट सावधान उभं राहायचं. मी दररोज बघते आपल्या वर्गातली मुले राष्ट्रगीताच्यावेळी गडबड करतात. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज म्हणजे आपला तिरंगा यांचा मान राखलाच पाहिजे. आणि त्याच बरोबर देशाची सेवा रोज केली पाहिजे. काय असे डोळे मोठे करून माझ्याकडे बघू नका! होय तुम्ही आणि मीदेखील आपल्या भारतदेशाची सेवा रोज केली पाहिजे स्वच्छता पाळून, झाडे लावून अन् ती जगवून आणि नियमांचे पालन करून.
मग करणार ना समाजसेवा..
चला तर मग म्हणा माझ्या सोबत..
भारतमाता की जय
वंदे मातरम्
अधिक वाचा – 15 ऑगस्ट भाषण मराठी
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
14 ऑगस्ट 1947 रोजी भारतात काय घडले?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी १५० वर्षांच्या इंग्रजी राजवटी पासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले . म्हणून आपण १५ ऑगस्ट दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो .
15 ऑगस्ट भाषण 2023
1 ) व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि देशभक्तीने प्रेरित झालेले श्रोतेगण या सर्वांना वंदन आणि ७६ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 15 ऑगस्ट भाषण मराठी
2) आज आहे १५ ऑगस्ट! आणि माझ्या हातात आहे तिरंगा झेंडा! 15 ऑगस्ट भाषण 2023
भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते?
भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंटआटली होते . भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते . ( भारताचे पहिले पंतप्रधान )
भारतात किती राज्ये आहेत?
आपल्या भारत देशात एकूण २८ राज्य आहेत.