छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज

धाडसी, पराक्रमी, शांत, दमदार पावले उचलणारा, समजूतदार, युद्धकौशल्यपटू, तरबेज तलवारबाज, मुलकी कारभारी, स्वराज्याचा प्रथम युवराज असलेल्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया….!

छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj | Marathi Sakha
छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj | Marathi Sakha

संभाजी महाराज इतिहास माहिती | Chhatrapati Sambhaji Maharaj

जन्म१४ मे १६५७
( पुरंदर किल्ल्यावर )
आईसईबाई

1. पहिल्या तीन मुली
2. चौथे अपत्य…संभाजी राजे
विवाह1. येसूबाई ( राजसबाई )
2. चंपा
3. दुर्गाबाई
अपत्ये1. मुलगी -भवानीबाई
2. मुलगा – शिवाजी(शाहू)
3. मधोसिंग
4. उधोसिंग
मृत्यू११ मार्च १६८९

छत्रपती संभाजी महारांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना

  • १६४१ – शिवरायांचा सईबाईंशी विवाह
  • विवाह समयी शिवरायांचं वय ११-१२
  • ५ सप्टेंबर १६५९ – सईबाईंचा मृत्यू
  • सईबाईंच्या निधनाच्या वेळी संभाजी राजांचे वय २ वर्ष होते.
  • अफजलखान वधाच्या सव्वादोन महिने आधी सईबाईंचा मृत्यू झाला.
  • शिवरायांचा दुसरा मुलगा (सोयराबाई ) राजाराम याचा जन्म
  • १६७१ सालचा तेव्हा संभाजी राजे १५ वर्षाचे होते.
  • शिवाजी महाराजांनी १६६१ साली शृंगारपूर घेतले.
  • संभाजीराजांचे एकूण आयुर्मान ३१ वर्षांचे .

विवाह

  • सन १६६१-१६६५ या दरम्यान केव्हातरी संभाजी आणि पिलाजी शिर्के यांची मुलगी राजसबाई (पुढे त्यांचे नाव येसूबाई असे ठेवले) यांचा विवाह झाला.
  • विवाह समयी येसूबाई ४-५ वर्षाच्या होत्या.
  • संभाजीराजांचा दुसरा विवाह रजपूत कन्या “चंपा ” हिच्याशी झाला.
  • संभाजीराजांचा तिसरा विवाह दुर्गाबाई यांच्याशी झाला असे काही इतिहासकार मानतात.

अपत्ये

  • मुलगी – भवानीबाई
  • मुलगा – शिवाजी ( शाहू )
  • “चंपा” या कच्छवाह घराण्यातील पत्नीपासून मधोसिंग आणि उधोसिंग अशी दोन अपत्ये झाली.

संभाजीराजांचा राजकारणात प्रवेश

  • ५ मार्च १६६६ संभाजी राजे शिवरायांसोबत आग्र्याला.
  • १५ मे १६६६ औरंगजेब बादशहाला कुर्निसात प्रकरण !
  • शिवाजी महाराज नजरकैदेत ! त्यावेळी संभाजी राजांची रवानगी रामसिंग यांच्याकडे मुक्कामी असे.
  • दिल्ली दरबारात संभाजीराजांची मनसबदार म्हणून नेमणूक १६६६
  • १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवराय आग्र्यावरून निसटले.
  • वाटेत मथुरेला “कृष्णाजी विसाजी” यांच्या ताब्यात संभाजीराजांना देऊन शिवराय साथीदारांसह २५ दिवसात रायगडावर परतले.
  • शत्रूपासून संभाजीराजेंचा बचाव व्हावा म्हणून संभाजीराजे मरण पावले अशी आवई उठवण्यात आली. त्यांची उत्तरक्रियादेखील उरकण्यात आली. त्यामुळे संभाजी राजांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग निर्धोक झाला.
  • पुढे ४-५ महिन्यातच संभाजीराजे रायगडावर सुखरूप परतले.
  • १६६७ साली शिवरायांनी मोगलांशी पुन्हा एकदा तह केला. याद्वारे संभाजीराजे पुन्हा मनसबदार झाले. आणि पुन्हा मुघलांच्या फौजेत हजर झाले.
  • २७सप्टेंबर १६६७ संभाजीराजे औरंगाबादला शाहजादा मोअज्जम याच्या छावणीत हजर झाले. पुढे १६६९ पर्यंत संभाजीराजे मोअज्जमसोबतच होते. त्यावेळी राजांचे वय अवघे १२-१३ वर्ष होते.
  • १६६९ मध्ये संभाजीराजे वडिलांकडे म्हणजे शिवरायांकडे परत आले. त्यानंतर त्यांचा मुक्काम जिजाबाईंसोबत होता.
  • २६ जानेवारी १६७१ संभाजीच्या नावे हुकूम – मुलकी कारभार प्रमुख बनले.
  • १६७१ – १६७४ मुलकी कारभार यशस्वी रितीने हाकला.
  • ५ जून १६७४ शिवरायांचा राज्याभिषेक
  • युवराज म्हणून संभाजीराजांना पटबंधन झाले व ते गादीचा वारस घोषित झाले.
  • या नंतर मंत्रिमंडळ आणि संभाजीराजे यांच्या बेबनाव झाला. पण शिवरायांनी दुर्लक्ष केले.
  • १६७६ ला शिवराय दक्षिण दिग्विजयाला गेले. पण स्वराज्याचा कारभार संभाजीराजांकडे दिला नाही. फक्त शृंगारपूरची जबाबदारी दिली.
  • १६७७ मध्ये संभाजीराजेंनी “बुधभूषणम ” हा संस्कृत ग्रंथ रचण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय २० वर्ष होते.
  • १६७८ कर्नाटक जिंकून शिवराय स्वराज्यात परत. संभाजीराजेंना सज्जनगडाकडे पाठवले.
  • १६७९-संभाजीराजे मोगलांना मिळाले.
  • मोगलांच्या वतीने त्यांनी भोपाळगड जिंकला. त्यावेळी संभाजीराजे दिलेरखानासोबत होते.
  • याच काळात कच्छवाह घराण्यातील सरदार कन्या चंपा हिच्याशी राजांनी विवाह केला.
  • तिकोट्याला दिलेरखानाने हिंदूंचा अमानुष छळ केला. तेव्हा पश्चातापाने संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात परत आले. (१३ जानेवारी १६८०)
  • नंतर संभाजीला पन्हाळा, प्रभावळी,व दाभोळ यांचा सरसुभा दिला.
  • ३ एप्रिल १६८० ला शिवरायांचा मृत्यू झाला तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यावर होते. पण राजेंना काहीच माहिती नव्हती.
  • शिवरायांच्या मृत्यू समयी संभाजीराजेंचं वय २३ वर्ष होते.
  • इकडे रायगडावर अण्णाजी दत्तो यांनी २१एप्रिल १६८०रोजी राजारामास गादीवर बसवले.
  • प्रल्हाद निराजी, बाळाजी आवाजी, मोरोपंत पिंगळे, सोयराबाई ही सर्व मंडळी कटात सामील होती.
  • संभाजी महाराजांच्या वतीने हंबीरराव मोहिते ( राजारामाचा सख्खा मामा ) यांनी मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, यांना रायगडावर कैद केले.
  • संभाजीराजे १८ जून १६८० रोजी रायगडावर हजर होते.
  • २०जुलै १६८० संभाजीराजांचे मंचकारोहण झाले.
  • १६ जानेवारी १६८१ राज्याभिषेक झाला.
  • १६८१ – औरंगजेबचा मुलगा शहाजादा अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला आला.
छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj
छत्रपती संभाजी महाराज | Chhatrapati Sambhaji Maharaj

घातापाताचा अयशस्वी प्रयोग

अकबराला हाताशी धरून १६८१ ला संभाजीराजांवर विष प्रयोगाचा कट करण्यात आला. पण तो अयशस्वी ठरून त्यात अण्णाजी दत्तो, बाळाजी आवाजी, हिरोजी फर्जंद यांना ठार करण्यात आले.

औरंगजेब जातीनिशी दक्षिणेत

शाहजादा अकबर आणि संभाजीराजांचे पारिपत्य करण्यासाठी १६८१ ला औरंगजेब स्वतः दक्षिणेत आला.

कवी कलश

  • हा एक कनोजी पंडित होता. त्याचे नाव कलश. कवीजी या शब्दाचा टपभ्रंश कब्जी आणि कलश या शब्दाचा अपभ्रंश कलुशा त्यावरून “कब्जी कलुशा” या नावाने तो ओळखला जायचा. हा माणूस संभाजीने आणलेला नव्हता.
  • मंत्रतंत्रविद्येत प्रवीण असणार्‍यांना पदरी ठेवण्याची मूळ पद्धत शिवरायांची. असाच एक मंत्रविद्यापटू “निश्चलदास” शिवरायांच्या आश्रयी होता.
  • याच निश्चलदासाच्या आग्रहावरून शिवरायांनी स्वतःला दुसर्‍यांदा बलिदानपूर्वक अभिषेक करवून घेतला.
  • पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळी बलिदान झाले नाही म्हणून “शुभ” नाही असा सल्ला निश्चलदासने दिला होता.
  • कवी कलश कर्तृत्वाने वर चढत “छंदोगामात्य” या पदापर्यंत पोहोचला होता.
  • संभाजीराजांनी त्याला “वाकनीस” करून सरकारकूनात म्हणजेच अष्टप्रधान मंडळात स्थान दिले होते.
  • तो अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख कधीच नव्हता.

संभाजीराजांचा मृत्यू

  • ११ मार्च १६८९ मध्ये संगमेश्वर जवळ मोगल सरदार मुकर्रबखानाने संभाजीराजांना पकडले.
  • पुढे तुळापूर जवळ वढू ( पुणे ) येथे त्यांचा वध करण्यात आला.
  • संभाजीराजांची पत्नी महाराणी येसूबाई आणि राजपुत्र शाहू यांना अटक करून दिल्लीला रवाना केले गेले.

संभाजीराजांची राजकीय कारकीर्द

  • जून १६८० – फेब्रुवारी १६८९
  • ८ वर्षे ८ महिने

संभाजीराजांच्या अंतकाळी राज्यस्थिती काय होती

  • किल्ल्यांवर अन्नधान्य, दारूगोळा विपूल होता.
  • खजिना भरपूर होता.
  • फौजा अडीचपट मोठ्या झाल्या होत्या.
  • मुलकी कारभाराची व्यवस्था चोख होती.
  • थोडेच किल्ले हातून गेले होते. बाकी सर्व स्वराज्यात शाबूत होते.
  • कर्नाटकातील राज्य दुपटीने वाढले होते.

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

छत्रपती संभाजी महाराज किती वर्षे जगले?

संभाजीराजांचे एकूण आयुर्मान ३१ वर्षांचे . (१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९) 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते?

शिवाजी ( शाहू ) महाराज , मधोसिंग , उधोसिंग

छत्रपती संभाजी महाराज किती वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले?

सईबाईंच्या निधनाच्या वेळी संभाजी राजांचे वय २ वर्ष होते. ५ सप्टेंबर १६५९ – सईबाईंचा मृत्यू.

Leave a comment

error: