मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi

माननीय परीक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी आपल्यापुढे मी आणि माझा स्वच्छ परिसर याविषयी दोन शब्द बोलणार आहे.

मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi | Mrathi Sakha
मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi | मराठी सखा

मी आणि माझा स्वच्छ परिसर | Maza Parisar Nibandh Marathi

सर्वप्रथम मी माझ्याबद्दल बोलतेय आणि नंतर माझ्या स्वच्छ परिसरा बद्दल बोलणार आहे.

बालमित्रांनो स्वच्छतेचे बाळकडू माझ्या आईकडूनच मला मिळाले आहे. त्यामुळे स्वच्छता ही माझी सवयच बनली आहे. माझ्या स्वच्छतेची काळजी आता मीच घेते. शाळेतून घरी आल्यावर आधी मी कपडे बदलून हात पाय धुऊन घेते. प्रत्येक वेळी जेवणाच्या आधी हात धुणे, दिवसातून दोन वेळा दात घासणे, काही खाल्ल्यानंतर चूळ भरणे, वाढलेली नखे कापणे ही सर्व कामे मी नियमितपणे करत असते.

शाळेत काही खाल्ले तर त्याचे कागद मी माझ्या दप्तरात ठेवते. रस्त्यात थुंकण्याचा मी तर विचारही करू शकत नाही. कारण त्याबद्दल मी आईचा मारदेखील खाल्ला आहे. खाताखाता चुकून काही खाली पडले तरी ते चटकन उचलून मी डब्यात टाकते. स्वच्छतेचा हा मंत्र मी लहानपणापासूनच जपत आलेले आहे. त्यामुळे तिचे महत्त्व, त्याचे फायदे मला चांगलेच ठाऊक आहेत.

मला माहीत आहे की अशी स्वतःची स्वच्छता, स्वतःच्या घराची स्वच्छता प्रत्येक जण काळजीपूर्वक करत असतो. त्याबद्दल त्याला इतरांनी सांगण्याची गरज नसते. पण जेव्हा तो माणूस घराच्या बाहेर पडतो तेव्हा मात्र तो स्वच्छतेची काळजी घेत नाही. आणि म्हणूनच आपल्याकडे रस्त्यावर, गल्ली बोळात, नाक्यावर, कचऱ्यांचे ढीग पडलेले दिसतात.

गरीब, अशिक्षित, याबरोबरच श्रीमंत आणि सुशिक्षितदेखील रस्त्यावर कचरा टाकण्यात पुढे असतात. स्वतःचे घर साफ करून रस्त्यावर कचरा टाकण्यात त्यांना काहीच वाटत नाही. एखादा पदार्थ खाऊन झाल्यानंतर त्यांची आवारणे रस्त्यात बिंधास्त टाकून देतात. खरंतर मला असं वाटतं अशा लोकांना पुन्हा एकदा शाळेत पाठवण्याची गरज आहे आणि तिथे त्यांना स्वच्छतेचे धडे द्यायला हवेत.

मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या कॉलनीत मी राहते आणि ज्या परिसरात मी राहते तो परिसर आम्ही सगळ्यांच्या मदतीने अगदी स्वच्छ ठेवला आहे. त्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने खूप प्रयत्न केले. आपल्या शहरातल्या इतर विभागासारखाच आमचाही विभाग खूप अस्वच्छ होता. पण आमच्या विभागातील मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले.

आधी सगळ्या लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे म्हणून काही वक्त्यांची भाषणे आयोजित केली. स्वच्छतेचे फायदे, रोगराई आणि आजारापासून मुक्तता याबद्दल लोकांना माहिती दिली. महानगरपालिकेच्या मदतीने सर्व विभाग स्वच्छ करून घेतला. लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. या कामी आम्ही लहान मुलांनी घरोघरी जाऊन पत्रके वाटली लोकांना कचरा टाकण्यासाठी विशिष्ट ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था केली. घंटागाडीच्या मदतीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची व्यवस्था केली. ही सर्व कामे मोठ्या लोकांनी केली.

मी तर आमच्या कॉलनीतल्या माझ्या वयाच्या मुलांना गोळा केले. आम्ही सर्वांनी घरोघरी जाऊन कचरा कचराकुंडीतच टाका अशा घोषणा दिल्या. छोट्या मुलांची स्वच्छतेबद्दल जागृती आणण्यासाठी प्रभात फेरी काढली. मी तर माझ्या मैत्रिणींना सोबत घेऊन एक छोटी नाटुकली बसवली होती. ती लोकांसमोर दोन वेळा सादरदेखील केली.

याचबरोबर आम्ही सर्व बालमित्रांनी स्वच्छतेची एक शपथही घेतली. की कुठेही कचरा करणार नाही. कुठे रस्त्यात कचरा टाकणार नाही. जवळपास कचराकुंडी नसेल तर स्वतःचा कचरा स्वतः जवळच ठेवू आणि योग्य त्या ठिकाणीच टाकू. या शपथेचा आम्हा मुलांवर खूपच चांगला परिणाम झाला सर्वच लोकांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणल्यामुळे आमचा सगळा परिसर आता खूप स्वच्छ झालेला आहे आणि सुंदरही झालेला आहे. आता आम्ही अनेक ठिकाणी झाडेही लावलेली आहेत. काही इमारतींच्या भिंतीवर स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी चित्रे रंगवलेली आहेत. त्यामुळे आमचा परिसर कसा खूप छान वाटतो.

पण एका गोष्टीचे वाईट वाटते. ते म्हणजे आम्हा छोट्या मुलांना स्वच्छतेचे महत्त्व लवकर समजले आणि फक्त समजले नाही तर ते आम्ही प्रत्यक्ष कृती तयार आणले. पण आमचीच काही मोठी माणसं मात्र स्वच्छतेचे महत्त्व समजूनही सगळीकडे कचरा करत असतात. आणि उगाचच कारणे देत असतात. जवळ कचराकुंडी नाही, सफाई कामगार साफ करतील. आम्ही त्यासाठी कर भरतो अशी कारणे देऊन स्वतःची जबाबदारी टाळतात.

मला या सर्व लोकांना एवढंच सांगायचं आहे की स्वतःसाठी नाही निदान आपल्या मुलाबाळांसाठी तरी आपला परिसर स्वच्छ ठेवा. त्यांना रस्त्यावर फिरता येईल, आनंदाने मैदानात खेळता येईल, चांगल्या ठिकाणी राहता येईल असे एक सुंदर जग तुम्हीच तर त्यांना देऊ शकाल.मग ऐकणार ना आमचं… चला तर सारे जण एक मंत्र जपूया….

जपा जपा रे मंत्र जपा

स्वच्छतेचा मंत्र जपा!

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment

error: