नमस्कार मराठी प्रेमी रसिकहो,
आपण रोजच्या व्यवहारात वाक्प्रचार म्हणींचा वापर करतो पण त्या म्हणी- वाक्प्रचार आपल्याला पूर्ण माहीत नसतात. बऱ्याचदा आपण त्यातला अर्धाच भाग वापरतो.
चला तर मग आता पाहूया काही म्हणी- वाक्प्रचार अगदी पूर्ण स्वरूपात.
Table of Contents
१) दुरून डोंगर साजरे जवळून पाहता काजरे
२) एका माळेचे मणी ओवायला नाही कुणी
३) अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय
४) बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊन या कोण तृप्त होय
५) हौसेला मोल नाही आणि दिव्याला तेल नाही
६) शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वाताड कशी
७) शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली
८) मोले घातले रडाया नाही असू नाही माया
९) मी हसतो लोकांना अन् शेंबूड माझ्या नाकाला
१०) मुंगी होऊन साखर खावी हत्ती होऊन लाकडे फोडू नये
११) पाप्याचं पितर आणि वर आला जवर/ज्वर
१२) पाण्यावाचून मासा झोपा घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा