मराठी शब्द अभ्यास 1 – चला तर काही शब्द पाहूया
Table of Contents
क्रेता ( संस्कृत ) - विकत घेणारा
विक्रेता - विकणारा
धव - पती , धनी , पुरुष यावरून.... विधवा, सधवा, गतधवा
खेचर = गाढव ( नर ) + घोडी
हिनी = घोडा (नर ) + गाढवी
खेचर हिनीपेक्षा ताकदवर दोघांनाही प्रजोत्पादन क्षमता नसते.
अमावास्या...... अमा - एके ठिकाणी वस् - राहाणे ज्या दिवशी चंद्र आणि सूर्य एका ठिकाणी आकाशात येतात ती स्थिती अमावास्येला चंद्र आणि सूर्य यांचे उदयास्त एकदमच होतात. यावेळी चंद्राचा पृथ्वीकडील भाग अप्रकाशित असल्याने चंद्र आपल्याला दिसत नाही.
तांबडा - लाल ( फारसी )
ताम्र ( संस्कृत ) तंब ( प्राकृतभाषा ) तांबडा ( मराठी )
- अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
समानार्थी म्हणजे काय?
एका अर्थाचे विविध शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
उदाहरणार्थ – सूर्य – आदित्य , भास्कर , सविता , दिनकर
या उदाहरणात आपल्याला असे दिसून येईल की सूर्य या अर्थाचे विविध शब्द दिलेले आहेत त्यालाच आपण समानार्थी शब्द समान अर्थाचे शब्द असे म्हणतो.