आजच्या स्वातंत्र्यदिनी युवकांनी करावयाची प्रतिज्ञा …
स्वातंत्र्याच्या होमात ज्यांनी अर्पिल्या आपल्या जीवनाच्या समिधा
स्मरून त्यांना करितो मी प्रतिज्ञा ….
सत्यासाठी सदैव लढेन
स्त्रियांचा आदर करेन
सहिष्णुतेने वागेन
सर्वधर्मांचा आदर करेन
प्रामाणिकपणे पैसे कमवेन
कायद्याचे पालन करेन
अंधश्रद्धेचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणवेन
योग्य उमेदवारास मतदान करेन मतदानाचा हक्क बजावेन
पर्यावरणाचे रक्षण करेन
पाण्याची, विजेची बचत करेन
झाडे लावेन, झाडे जगवेन
राष्ट्रीय संपत्तीचे जतन आणि रक्षण करेन
राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवेन
राष्ट्रनिष्ठा अंगी बाणवेन
महासत्ता नव्हे तर आदर्श राष्ट्र घडविण्यात खारीचा वाटा उचलेन
मी राष्ट्राचा आणि राष्ट्र माझे याचे सदैव भान ठेवेन
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
अधिक वाचा –
फोटोच्या बाजूला दिलेल्या बटनावर क्लिक करून तुम्ही प्रतिज्ञा फोटो फ्री मध्ये डाउनलोड करू शकतात.
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
७६ वा ७७ वा स्वातंत्र्यदिन आहे का?
१५ ऑगस्ट २०२३ चा स्वातंत्र्य दिवस हा ७७ वा स्वातंत्र दिवस आहे.
भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला?
भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले.