अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi

कोणती भाषा समृद्ध होत असते ती शब्दांनी. त्यात येणारे विविध शब्द, त्यांचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द, तसेच भाषेत प्रचलित असणारे विविध वाक्प्रचार, म्हणी हे सर्व म्हणजे त्या भाषेचे सामर्थ्यच असतात. त्यापैकी एक आपण आज समानार्थी शब्द पाहू !

पण त्यातही अ ने सुरू होणाऱ्या समानार्थी शब्दांची थोडी जंत्री पाहूया. उदाहरण द्यायचं झालं तर आपण “अनिल ” हा शब्द घेऊया. अनिल म्हणजे वारा वाऱ्याचे अनेक समानार्थी शब्द सांगता येतील. जसं अनिल – वारा, हवा, समीर, पवन, मरुत, प्रभंजन!

असे आपण समानार्थी शब्द जर आपल्या पोतडीत असतील तर भाषा वापरताना, बोलताना, लिहिताना खूप चांगला उपयोग होतो. आणि योग्य ठिकाणी योग्य शब्द चपखलपणे बसवता येतो. त्यामुळे आपली भाषा अधिक सुंदर आणि प्रभावी अशी होते. आणि म्हणूनच हा अभ्यास आपण करायचा पण तोही अगदी आनंदाने! चला तर मग पाहूया अ ने सुरू होणारे इतर काही शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द !!

अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi | Marathi Sakha
अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi | Marathi Sakha

अ समानार्थी शब्द मराठी | A Samanarthi Shabd Marathi

अमृतसुधा , पियुष
अश्वघोडा , वाजी , अस्व , हय
अरण्यवन , जंगल , रान
अखंडसलग , एकसंध , संपूर्ण
अगत्यआपुलकी
अग्रणीमुख्य
अग्नीआग , विस्तव , पावक
अनिलवारा , हवा , समीर , पवन , मरुत , प्रभंजन
अचानकअकस्मिक
अधिकारहक्क , प्रभुत्व
अवलोकननिरीक्षण
अट्टाहासआग्रह
अनुक्रमाणिकासूची
अनुमोदन संमती , होकार , मान्यता
अभ्याससराव
अभिमानमान , गर्व
असूयाहेवा , द्वेष
अनुकूलफायदेशीर
अप्रतिमअद्वितीय
अपमानअनादर
अहीसाप , सर्प
अर्जुनपार्थ
अस्तलोप , शेवट
असुरराक्षस
अनर्थसंकट
अनाथपोरका
अधूअपंग
अधोगतीऱ्हास
अतिरेकअमर्यादा
अद्भुतविलक्षण
अशक्तदुर्बल
अट्टहासआग्रह
अभ्युदयउत्कृष्ट
अद्वैतद्वंद्व
अभियोगआरोप , आळ

अधिक वाचा –

  • समानार्थी शब्द मराठी

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी व्याकरण

FAQ – काही प्रश्न

धरणी चा समानार्थी शब्द काय आहे?

धरणी या शब्दाचे मराठीत समानार्थी शब्द आहेत – पृथ्वी ,भूमी , वसुंधरा

लेक ला समानार्थी शब्द काय?

लेक या शब्दाचे मराठीत समानार्थी शब्द आहेत – पुत्र , मुलगा , सूत

Leave a comment

error: