अहिराणी भाषा | Ahirani Language

मराठी ही आपली मायबोली असून तिच्या छोट्यामोठ्या जवळपास ५२ बोलीभाषा आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणजेच अहिराणी भाषा. चला तर मग आज आपल्या अहिराणी भाषेविषयी अधिक जाणून घेऊया…..!

अहिराणी भाषा | Ahirani Language | Marathi Sakha
अहिराणी भाषा | Ahirani Language | Marathi Sakha

बहिणाबाई चौधरी

“अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर

आधी हाताले चटके तवा मियते भाकर “

अहिराणी भाषेत कविता लिहिणार्‍या “कवयित्री बहिणाबाई चौधरींना ” उभ्या महाराष्ट्रात ओळखत नाही असा काव्य रसिक सापडणार नाही. अहिराणी भाषेला खर्‍या अर्थाने नव्याने ओळख आणि अभ्यासक मिळवून दिले ते बहिणाबाई चौधरींनी !

Ahirani Language | अहिराणी भाषा माहिती

  • मराठीची बोलीभाषा व पोटभाषा म्हणून ओळखली जाते.
  • खूप मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळात बोलली जाते.

अधिक वाचा मराठी भाषेचे महत्व

अहिराणी हे नाव कसे पडले

  • अभिर लोकांची भाषा
  • अभिरांची भाषा अभिराणी
  • अभिरचा अपभ्रंश अहिर
  • अभिराणीचा अपभ्रंश अहिराणी

अभिर ( अहिर ) लोक कोण?

  • अहिर एक जात आहे.
  • बिहार, ओरिसा, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, सौराष्ट्र, खानदेश
  • गुजर-अहिर नावे एकत्र घेतली जातात.
  • दोघेही गुरे पाळतात.
  • दोन्ही जमाती एकाच वंशाच्या आहेत असे मानतात.
  • हे लोक मध्य आशियातून सिंधू नदीच्या खोर्‍यात उतरले असे मानतात.
  • हे सिरियन वंशाचे असावेत अशी एक समजूत होती.पण ते आर्यच होते.
  • इसवी सनापूर्वी १-२ शतकात आगमन
  • जाट-उंट पाळणारे, गुजर-गुरे पाळणारे, अहिर-गवळी
  • आता सगळेच शेतकरी
  • १४ व्या शतकात अभिर खानदेशात आले.

खानदेश

  • आजचे धुळे व जळगाव हे जिल्हे पूर्वी एकत्र होते. त्या सर्व परिसराला खानदेश म्हणतात.
  • १९०६ – खानदेशचे दोन भाग
  • धुळे – पश्चिम खानदेश
  • जळगाव पूर्व खानदेश
  • १९६० – जळगाव जिल्हा निर्माण झाला.

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

खानदेश नावाची व्युत्पत्त्ती

  • खंड / खिंड या शब्दावरून खानदेश
  • सेऊण – सेऊनदेश – खानदेश
  • सेऊनचंद्र या यादवकालीन राजाच्या नावावरून
  • कन्न म्हणजे कृष्ण – कृष्णाचा देश
  • कानड म्हणजे गवळी – खानदेश
  • कन्नदेशकानडदेश – खानदेश
  • खानदेशातील थाळनेर येथे राजा मलिक नासिर खान यावरून खानदेश
  • कान्हदेश – यादव राजा श्रीकृष्ण याचा देश यावरून खानदेश
  • प्राचीन नाव – ऋषिक
  • यादवकुळात – सेऊनदेश
  • मोगलकाळात – खानदेश

बागलाण

  • इसवी सन १७०० च्या सुमारास “बागुल” नावाचा राजा होऊन गेला.
  • बागुल…..बागलाण……बागलाणी
  • ज्ञानेश्वरीत “बागलाण नवरी” चे अभंग याचा उल्लेख येतो.
  • बागलाणी म्हणजेच अहिराणी!
  • सध्या बागलाण, कळवण, मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, दिंडोरी, सुरगाणे, या भागात जी अहिराणी बोलली जाते तिला “बागलाणी” असे म्हणतात.
  • अभिर….अहिर…..अहिराणी
  • जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्याचा उत्तरभाग, बर्‍हाणपूर हे अहिराणीचे भाषाक्षेत्र आहे.
  • सातपुडा पर्वत…वाघूर नदी….अजिंठ्याचे डोंगर….चांदवड….सह्याद्रीच्या रांगा या चतुःसीमेच्या आत अहिराणी भाषा बोलली जाते.
  • उत्तरेकडे गुजरातीचा प्रभाव आहे.
  • खानदेशात बोलली जाते ती खानदेशी.
  • खानदेशी म्हणजेच अहिराणी भाषा होय.

अधिक वाचा – महाराष्ट्राची माहिती

भाषा विशेष

  • “ळ” ऐवजी य – डोळा – डोया
  • “स” ऐवजी छ – सावली – छावली

अहिराणी भाषेतील काही शब्द

  • दोबड – म्हैस
  • जितराब पाळीव प्राणी
  • सरमट – सरमाड
  • डिर – कोंब, अंकुर
  • कुटार – गव्हाच्या काड्यांच्या बारीक तुकड्या
  • खकाना धूळ
  • कज्या भांडण
  • रावण्या विनंत्या,मनधरणी
  • आंदन आहेर,लग्नातली भेट
  • कुटाना – छोट्याशा गोष्टीसाठी खूप कष्ट करावे लागणे
  • आबगी – अचानक
  • निस्तं – नुसते
  • फुली – नाकातली मुरणी
  • बचक – ओंजळ
  • टुमणं लावणं – लकडा लावणं
  • फाळकं मार – फुकटचं घे
  • वट – उटी
  • चव ना धव – ज्याला चव नाही तो
  • यंगरट – आपलंच खरं म्हणणारा
  • बक – वाईट बोल (त्यावरून बकवास)
  • कव्हळ – केव्हा
  • गंज – खूप, पुष्कळ
  • धवळं / ढवळं – पांढरे, धवल
  • नवातुरना , नैतरणा – तरुण
  • पावत – पर्यंत
  • हुभा – उभा
  • फिंद्री – मुलगी / नकोशी मुलगी
  • फिस्कं – अंगावरील चिघळलेल्या जखमेला फिस्कं म्हणतात.
  • मेचंड – वाळलेला शेंबूड
  • साक – भाजी
  • घुगरी – उसळ
  • बाशी – शिळं
  • कोंडाळ – थालिपीट ( विविध धान्यांच्या सात प्रकारच्या पिठापासून तयार करतात. पूर्वी सात प्रकारच्या कोंड्यापासून हा पदार्थ बनवत असत. )
  • रांधनं – स्वयंपाक
  • तमान – ताट (बंगालीतही ताटाला तमान म्हणतात)
  • काठोक – काठवट(लाकडी परात)
  • फुरका – ओरपणे
  • उपतं / उगतं – अंगावर काम घेणं

कवयित्री बहिणाबाई चौधरी

नावबहिणाबाई नथूजी चौधरी
जन्म११ ऑगस्ट १८८० – (असोदा )
( काहींच्या मते २४ ऑगस्ट)
मृत्यू३ डिसेंबर १९५१ – ( जळगाव )
अपत्ये1. अंकुश चौधरी
2. कवी सोपानदेव चौधरी

अहिराणी भाषेत काव्य लेखन केले.

बहिणाबाई या निरक्षर होत्या. त्यांना गाणी सूचत. त्या घरात, शेतात काम करता करता गाणी म्हणत. ती गाणी त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी आणि सोपानदेवांचे मावसभाऊ पितांबर चौधरी यांनी लिहून घेतली. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर सोपानदेवांनी ही सर्व गाणी आचार्य अत्रेंना दाखविली.

तेव्हा अत्रे म्हणाले,’अहो, हे तर बावनकशी सोने आहे ते महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे गुन्हा आहे.’ मग १९५२ मध्ये आचार्य अत्रेंच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंचा अहिराणी भाषेतील कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यात फक्त ३५ कविता आहेत. त्यानंतर अहिराणी भाषेकडे अभ्यासकांचा, वाचकांचा तरुणांचा ओढा पुन्हा एकदा वाढला.

“आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर

अरे जगनं- मरनं एका सासाचं अंतर”…..

बहिणाबाई

अहिराणी ही मराठीची बोली आहे का?

मराठीची बोलीभाषा व पोटभाषा म्हणून ओळखली जाते. मराठी ही आपली मायबोली असून तिच्या छोट्यामोठ्या जवळपास ५२ बोलीभाषा आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणजेच अहिराणी भाषा .

खानदेशी भाषा माहिती

महाराष्ट्र राज्यातील आजचे धुळे व जळगाव हे जिल्हे पूर्वी एकत्र होते. त्या सर्व परिसराला खानदेश म्हणतात. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी. खानदेशी म्हणजेच अहिराणी भाषा होय.

अहिराणी ही भाषा आहे का?

महाराष्ट्र राज्यातील आजचे धुळे व जळगाव हे जिल्हे पूर्वी एकत्र होते. त्या सर्व परिसराला खानदेश म्हणतात. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी. खानदेशी म्हणजेच अहिराणी भाषा होय.

खानदेश नाव कसे पडले

खंड / खिंड या शब्दावरून खानदेश . आजचे धुळे व जळगाव हे जिल्हे पूर्वी एकत्र होते. त्या सर्व परिसराला खानदेश म्हणतात.

Ahirani Language

महाराष्ट्र राज्यातील आजचे धुळे व जळगाव हे जिल्हे पूर्वी एकत्र होते. त्या सर्व परिसराला खानदेश म्हणतात. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी. खानदेशी म्हणजेच अहिराणी भाषा होय. मराठी ही आपली मायबोली असून तिच्या छोट्यामोठ्या जवळपास ५२ बोलीभाषा आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणजेच अहिराणी भाषा .

खानदेशी भाषा

महाराष्ट्र राज्यातील आजचे धुळे व जळगाव हे जिल्हे पूर्वी एकत्र होते. त्या सर्व परिसराला खानदेश म्हणतात. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी. खानदेशी म्हणजेच अहिराणी भाषा होय. मराठी ही आपली मायबोली असून तिच्या छोट्यामोठ्या जवळपास ५२ बोलीभाषा आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणजेच अहिराणी भाषा .

ahirani language in marathi

मराठीची बोलीभाषा व पोटभाषा म्हणून ओळखली जाते. मराठी ही आपली मायबोली असून तिच्या छोट्यामोठ्या जवळपास ५२ बोलीभाषा आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणजेच अहिराणी भाषा . महाराष्ट्र राज्यातील आजचे धुळे व जळगाव हे जिल्हे पूर्वी एकत्र होते. त्या सर्व परिसराला खानदेश म्हणतात. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी. खानदेशी म्हणजेच अहिराणी भाषा होय.

Leave a comment

error: