मराठी लेख | Marathi Lekh | विविध विषयांवरचे मराठी लेख संग्रह

मराठी लेख | Marathi Lekh  | Marathi Sakha
मराठी लेख | Marathi Lekh | Marathi Sakha

मराठी लेख | Marathi Lekh क्र. 1 | भाषा येणे म्हणजे काय?

भाषा येणे म्हणजे काय?

भाषा येणे म्हणजे परीक्षेत गुण मिळवणे नव्हे…..

भाषेत उपमा, उत्प्रेक्षा अलंकार असतात.

वाक्प्रचारम्हणी, सुभाषिते असतात.

उपहास, अतिशयोक्ती, करामती असतात.

कोपरखळ्या, टोमणे, धक्के, आणि द्विअर्थी शब्दांची रेलचेल असते.

या साऱ्यांशी आपली मराठी भाषिक म्हणून ओळख असणे, त्यांचा आपल्या बोलण्यातून सढळ हस्ते वापर करणे आणि या भाषिक कौशल्याचा स्वतः आनंद घेणे अन इतरांनाही देणे, असे भाषिक कौशल्य प्राप्त करणे म्हणजे भाषा येणे होय.

मराठी लेख | क्र.2 | पत्र

पत्र……….. !

पत्र म्हणजे… भावनेत भिजलेले शब्द

पत्र म्हणजे…. गोड आठवणीचा ठेवा प्रत्येकानेच घेतला पाहिजे असा वसा!

पत्र म्हणजे……. प्रेम आणि जिव्हाळा

स्नेहाच्या धाग्याने बांधलेला गोतावळा !

पत्र म्हणजे…..नेहमीच घरी यावा असा मित्र!

पत्र म्हणजे…… एखाद्याच्या अंतरंगाचं पारदर्शक चित्र!

पत्र स्पर्श करतात हृदयाला

आणि भिजवतात मनाला !

मराठी लेख | क्र.3 | नावात काय दडलंय ?

नावात काय दडलंय ?

नावात काय दडलंय ? असा प्रश्न जरी शेक्सपिअरने विचारला असला तरी नावात बरंच काही असतं हे मात्र खरंच!

मी जेव्हा स्वतःला मराठी भाषिक समजतो तेव्हा आपल्या पाठीशी संत ज्ञानदेवादी संतांची ८००-९०० वर्षांची दीर्घ अशी भक्तीची, छत्रपती शिवरायांनी उभी केलेली त्यागाची- शौर्याची अन् डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची सार्‍या जगाला ललामभूत ठरलेली समतेची, न्यायाची अन् संघर्षाची एक संपन्न परंपरा आपल्या पाठीशी उभी राहाते.

आपली भाषा आणि त्यासोबत ओघाने येणारे आपले आडनाव आपल्याला एक विशिष्ट संस्कृतीशी जोडते. आपल्या पाठीशी उज्ज्वल परंपरा उभी करते. तीच आपली खरी ओळख असते. हीच नावे आपला अभिमानबिंदू पुरवत असतात. की जे पुढील आयुष्यात मानसिक बळ देतात. आयुष्याला सामोरं जायचं सामर्थ्य देतात.

समाजात अनेक घराणी आपण पहातो. मराठ्यांच्या इतिहासात अशी अनेक घराणी प्रसिद्धीस आली होती. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर भोसले, घोरपडे, मोरे, पासलकर,जाधव, जेधे अशी अनेक नावे घेता येतील. पुढे पेशव्यांचे भट घराणे ही अनेक वर्ष सत्ताकारणात होते.

राजेशाही संपली. इंग्रज गेले. भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली. सामाजिक सुधारणांचं पर्व सुरू झालं. त्यातूनच अनेक लोक समाजासाठी काम करू लागले. आपल्या मित्र परिवार, ज्ञातीबांधवांच्या मदतीने मोठमोठी कामे त्यांनी पूर्णत्वास गेली. त्यातून समाज सामाजिक अन् वैचारिकदृष्ट्या प्रगत होण्यास मदत झाली.

ही सर्व समाजासाठी विविध पातळीवर काम करणारी मंडळी पुढे समाजात आदर्श बनून राहिले. त्यांचे कार्य, त्यांची जीवनपद्धती, त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू लागले. ही सर्व व्यक्तिमत्त्वे त्या त्या ज्ञाती बांधवांसाठी आदर्श बनली.

आणि म्हणूनच त्या सर्व पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या कार्याचा वारसा चालवणे ही नव्या पिढी कर्तव्यता ठरते.

अधिक वाचा – श्रावण मास निबंध मराठी

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

Leave a comment

error: