युगप्रवर्तक महामानव, द्रष्टा, काळाच्या पुढे विचार करणारा, समकालीन राजा महाराजांपेक्षा निराळा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठी माणसाचा अभिमानबिंदू, समस्त भारतीयांचा मार्गदर्शक, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी राजा अशी ज्यांची ओळख समस्त जगाला आहे असा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी शहाजी भोसले.
ज्यांचं नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभे राहातात. जय शिवाजी जय भवानी ही घोषणा बेंबीच्या देठापासून उच्चारताना नसानसातून रक्त वेगाने वाहू लागतं ते छत्रपती शिवराय.…!
नाव | शिवाजी शहाजी भोसले |
जन्म | १९ फेब्रुवारी १६३० ( शिवनेरी किल्ल्यावर ) |
मृत्यू | ३ एप्रिल १६८० |
वडील | शहाजी मालोजी भोसले |
आई | जिजाबाई (जाधव घराणे) |
भाऊ | संभाजी (बंगळूरची जहागिर) |
पत्नी | ( एकूण आठ पत्नी ) 1. सईबाई 2. सगुणाबाई 3. सोयराबाई 4. पुतळाबाई 5. लक्ष्मीबाई 6. सकवारबाई 7. काशीबाई 8. गुणवंताबाई |
मुले | ( एकूण २ मुले ) 1. संभाजी 2. राजाराम |
मुली | ( एकूण 6 मुली ) |
सुना | 1. येसूबाई ( संभाजी ) 2. ताराबाई ( राजाराम ) |
सारा महाराष्ट्र जेव्हा मुस्लिम सत्तेच्या क्रूर वंरवंट्याखाली चिरडला जात होता, अन्याय, अत्याचाराने कळस गाठला होता, अशावेळी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, धर्माचे, न्यायाचे, नीतीचे, सत्याचे राज्य स्थापन केले. शिवरायांना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले.
त्यातली १५ वर्षे बालपणात गेली. उरलेल्या ३५ वर्षात असे काही कार्य केले की शिवराय युगप्रवर्तक कल्याणकारी राजे बनले.
- अफजलखान वध – १० नोव्हे. १६५९
- पन्हाळगडावरून सुटका – २ मार्च १६६०
- शायिस्तेखानाची बोटे छाटली – ५ एप्रिल १६६३
- आग्र्याहून सुटका – ६ मार्च १६७०
- १६४२ – दादोजी कोंडदेवांच्या हाताखाली कारभार सुरू
- १६४२-४७ – पाच वर्षात १२ मावळ ताब्यात घेणे व व्यवस्था लावणे हा उपक्रम राबवला.
- १६४५ – राज्याच्या निर्मितीची प्रकट घोषणा
- १६४५-१६४७ – तोरणा, रोहिडा, राजगड, सिंहगड, पुरंदर हे किल्ले जिंकले.
- १६४६ – फलटणचे राजे निंबाळकर, खंडोजी / बाजी घोरपडे यांना पराभूत केले.
- १६४८ – वडील शहाजीराजे यांना अटक
- १६४९-१६५६ – सात वर्षे विश्रांतीची !
- १६५६-१६६६ – धामधुमीची दहा वर्षे
- १० नोव्हेंबर १६५९ – अफजलखानाचा वध
- १६६० – आरमार उभारणी सुरू
- १६६०-१६६३ – शायिस्तेखानाचा पुण्यात तळ
- १६६४ – सुरतेची लूट
- मार्च १६६५ – मिर्झाराजे जयसिंगांची स्वारी
- ९ / १६६६ – आग्र्याहून पलायन
- १६६६-१६६९ – मुघलांबरोबर शांतता करार
- १६६९-१६७० – मिर्झा तहात गमावलेले सर्व राज्य परत मिळवले.
- १६७० – सुरतेची लूट दुसरी
- १६७४ – राज्याभिषेक
- ३ एप्रिल १६८० – मृत्यू
- टोळ्यांची पुंडाई मोडून काढली
- सरदार, पाटील, यांना वठणीवर आणले
- महालवारी कर पद्धती बंद करून रयतवारी सुरू केली
- शेतकर्यांना पाणी व शेतीत इतर सुधारणा केल्या.
- स्त्रियांच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष दिले. विशेष प्रसंगी स्वकियांचीही गय केली नाही.
- वतनदारी पद्धत बंद केली.
- दुष्काळात शेतकर्यांना शेतसार्यात सवलत दिली.
- स्वतःचे सैन्य उभे करून शिलेदारांचे प्रस्थ मोडीत काढले.
- सर्व धर्मियांना सैन्यात स्थान दिले.
- परधर्मियांच्या धार्मिक ग्रंथांचा, स्थळांचा सन्मान केला.
- परधर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात घेतले.
- नवनवीन गड किल्ल्यांची उभारणी केली.
- सागराचे महत्त्व ओळखून पहिले स्वदेशी आरमार उभे केले.
- युरोपीय टोपीकरांचा वेळीच बंदोबस्त केला.
- आपली ताकद ओळखून कधी युद्ध कधी माघार तर कधी तह केले. पण स्वराज्य निर्मिती केली.
- प्रसंगी स्वतः मोहिमेवर गेले. सैन्याला लढण्याचे बळ दिले. आपला राजा स्वराज्यासाठी मरायला तयार आहे हा विश्वास दिला.
- स्वराज्य शत्रू मग ते भाऊबंद असले तरी त्यांचे बिमोड केला.
- महाराष्ट्राच्या नैसर्गिक ,भौगोलिक गोष्टींचा म्हणजेच डोंगर दर्यांचा पुरेपुर वापर करवून घेत कमी फौज असतानाही अगदी लाखोंच्या फौजेंचा पराभव केला.
- गनिमी काव्याचा परिचय लोकांना करवून दिला.
- स्थानिक लोकांचे, मावळ्यांचे स्फुल्लिंग चेतवून त्यांच्यातील सामर्थ्य जागे करून त्यांचा स्वराज्य निर्मितीसाठी उपयोग करवून घेतला.
- जनतेच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली.
- अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. त्यांच्या मार्फत राज्यकारभार चालवला.
- सैनिकी व मुलकी अधिकारी यात मुलकी अधिकार्यांना मोठे आणि जास्त अधिकार देऊन दूरदृष्टी दाखवली. ती पद्धत आजच्या आधुनिक लोकशाही जगातदेखील चालू आहे.
- असे हे छत्रपती शिवराय सार्या जगाने त्यांच्या जीवनकार्यातून बोध घ्यावा आणि आपलेही जीवन उजळवून घ्यावे. अशा ह्या अलौकिक राजाला माझा त्रिवार सलाम.
॥जय शिवराय, जय शिवराय॥
- अधिक वाचा – लोकमान्य टिळक यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले?
५o वर्षे
शिवाजी महाराजांचे वडील कोण होते?
शहाजीराजे भोसले
शिवरायांचा जन्म कुठे झाला?
१९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर
हिंदवी स्वराज्याची स्थापना कधी झाली?
१६व्या वर्षी 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली
भारतीय नौदलाचे जनक कोणते?
छत्रपती शिवाजी महाराज